
पद्मश्री डॉ. हृदयनाथ मंगेशकर
“व्हायोलिन हे सुरात वाजवायला फार अवघड वाद्य आहे. याला पडदा नाही. एक जरी बोट इकडचं तिकडे झालं तरी तो सूर तात्काळ बेसूर होतो. त्या व्हायोलिन वादकाला फार सांभाळावं लागतं. पूर्वी ३-३ कंडक्टर उभे करून व्हायोलिन वर गाणी रेकॉर्ड व्हायची. आज या मुलांसमोर एक ही कंडक्टर नसताना यांनी इतकं बरोबर वाजवलं, यासाठी स्वरस्वप्नचं आणि स्वप्ना ताईंचं खूप खूप कौतुक!“
पद्मभूषण डॉ. एन राजम
“ या इतक्या सगळ्या छोट्या मुलामुलींनी मिळून इतकं accurate, अचूक आणि precision आणि perfection ने वाजवलं याचं मला फार आश्चर्य वाटलं. व्हायोलिन वादकांसाठी Group Programs ही एक नवीन संधी आहे, खूप छान प्रयोग आहे. स्वरस्वप्न कडून असेच चांगले प्रयोग होत राहोत. “


पद्मश्री पद्मजा फेणाणी
“ दोनच शब्दांत याचं वर्णन करू इच्छिते; अद्भुत आणि सुरेल. खूप आनंद मिळाला. स्वप्न ताईंनी ही जी किमया केली आहे की असं वाटतं, आभाळातली सगळी नक्षत्रं उतरुन खाली आली आहेत. अशा पद्धतीचं सादरीकरण मी कुठेच पाहिलं नाही. असेच स्वप्नाताईंच्या छत्रछायेखाली फळत रहा, फुलत रहा, बहरत रहा. अनेकोत्तम शुभेच्छा!”
श्री. प्रशांत दामले
“स्वरस्वप्न हा जो व्हायोलिन वादकांचा समूह आहे; जरी ती लहान मुलं असली तरी व्हायोलिन वाजवताना मोठ्यांपेक्षाही वरताण वाजवतात, मनापासून वाजवतात. त्या छोट्या बोटांतून निघणारे गोड सूर ऐकून ही मुलं सुरात आहेत हे कळतं. मला असं वाटतं की स्वरस्वप्नचे प्रयोग फक्त पुण्यात च नाही तर देश विदेशात व्हावेत. माझ्याकडून या समूहाला खूप खूप शुभेच्छा!”


पं. विजय कोपरकर
“हे सर्व विद्यार्थी आणि पालक यांचं मी सगळ्यात आधी अभिनंदन करतो. या मुलांच्या हातात जे काही आज आलंय, त्याच्याबद्दल एवढंच सांगेन की सातत्य ठेवा. सातत्याने याचा रियाझ करा. आताच्या जगात तुम्ही संगीतासोबत राहिलात तर तुमच्या आयुष्याचं नक्की सोनं होईल. चांगल्या गुरूंकडून तुम्हाला आज हे सर्व शिकायला मिळतंय, आणि तुम्ही खूप सुंदर वाजवता आहात. याचा आनंद घ्या आणि सातत्य ठेऊन रियाझ करून हा आनंद देत आणि घेत रहा.”
पं. रामदास पळसुले
“अतिशय सुंदर आणि मधुर वादन आहे. सगळ्यांना खूप आशिर्वाद. इतके सगळे व्हायोलिन एकत्र असूनही कोणीच बेसूर होत नाहीये ही कौतुकाची गोष्ट आहे. त्यामुळे खूप आनंद मिळतोय. या क्षेत्रात जितके एकाग्र रहाल, तितके तुम्ही पुढे जाल. ही गोष्ट लक्षात ठेवून असंच छान काम करत रहा.”


डॉ. चैतन्य कुंटे
“स्वप्ना दातार यांचं ‘स्वरस्वप्न’ साकार करणारी ही सर्व मंडळी आणि स्वप्ना ताई यांनी घेतलेली मेहनत ही नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. मला आवडलेला एक भाग असा की त्यांचं वादन छान चालूच आहे पण त्याचबरोबर त्यांच्या चेहऱ्यावर ते वादनात किती रमले आहेत हे दिसून येतंय. आणि कुठल्याही कलेमध्ये प्रावीण्य मिळवण्याची ही पहिली पायरी आहे. मी या सर्वांना खूप शुभेच्छा देतो.”






